शाळेतील आठवडे बाजाराला मोठा प्रतिसाद; सेलूतील ज्ञानतीर्थ विद्यालयाचा उपक्रम

शाळेतील आठवडे बाजाराला मोठा प्रतिसाद; सेलूतील ज्ञानतीर्थ विद्यालयाचा उपक्रम

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या ज्ञानतीर्थ विद्यालयात मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियांतर्गत शाळा व्यवस्थापन समिती आयोजित शनिवारी रोजी शाळेतील क्रीडांगणावर विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार भरविला होता. याला शिक्षक, पालकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बाजाराचे उद्घाटन संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कुपटा येथील मंडळ अधिकारी सरिका हेडगे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, मुख्याध्यापिका शालिनी शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांना व्यवहार व्यवहार ज्ञान हा उपक्रमाचा हेतू होता. १७७ विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला, फळांची,भाजीपाला, फळे, दही, दुध, तूप आदी जीवनावश्यक वस्तूंची छोटी दुकाने शेतकरी वेशभूषेत लावली होती. रोडगे प्रिन्स इंग्लिश तसेच फिनकिडस् स्कूलमध्ये बॅगलेस शनिवारलाही प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने विविध कार्यक्रम झाले. प्राचार्य कार्तिक रत्नाला, मीनाक्षी रत्नपारखी, प्रगती क्षीरसागर, प्रा.महादेव साबळे आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!