Nitin Chashak : राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व.नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून; नऊ दिवस रंगणार क्रिकेटचे सामने
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, डॉ.प्रताप काळे, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
सेलू : सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व.नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा १५ ते २३ जानेवारी या कालावधीत नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर होत आहेत. सोमवारी, १५ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता स्पर्धेचे उद्घाटन आहे. माहिती मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी ही माहिती दिली.
उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, तर अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर असतील. प्रमुख पाहुणे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी मेघना कावली, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हळ, तहसीलदार दिनेश झांपले, मुख्याधिकारी देविदास जाधव डॉ.जनार्धन गोळेगांवकर, माधव यादव, एस.टी. पठाण, एस.एन. केंद्रे, सेलू बाजार समितीचे सचिव राजीव वाघ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. २४ व्या स्पर्धेत राज्यातील नामवंत १६ संघाचा समावेश आहे. २० षटकांचे सामने खेळविण्यात येणार आहेत. खेळाडूंना गणवेश, भोजन ,निवास व्यवस्था मोफत केली जाते. विजेत्या संघास रोख १ लाख रु चषक व उपविजेता संघास ५१ हजार तर मालिकावीर २५ हजार रोख बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धा संयोजक प्रा. नागेश कान्हेकर, गणेश माळवे, सहसंयोजक संतोष कुलकर्णी, अविनाश शेरे, कल्याण पवार, सय्यद हमिद, शेख अब्दुल (पेंटर),क्रीडांगण प्रमुख सतीश नावाडे, डी.डी. सोन्नेकर, राजेश राठोड, दिपक निवळकर, कुणाल लहानेआदी काम पाहणार आहेत. पंडीतराव आरकुले, विनायक अप्पा खंडागळे, पंडीतराव वाघ, जिजाभाऊ सोळंके, दत्ता जाधव, रमेश अप्पा मसुरे, बालासाहेब नाईकवाडे, शत्रुघ्न मगर, बालासाहेब चव्हाण, जनाभाऊ मगर, श्यामराव मोगल, संतोष गात, रमेश गजमल, राजेश लोया, रतन दायमा, ओमप्रकाश तोष्णीवाल, श्रीनिवास झंवर, राजेंद्र मणियार, संपतराव शेरे, पारस काला, रामभाऊ गायकवाड, पवन घुमरे, पांडुरंग कावळे, हरिभाऊ काळे, बाबा लोखंडे, विक्रम काळे, बंडु देवधर, बप्पा मोगल, विनयाकराव रोडगे, प्रकाश जंगले लक्ष्मणराव दौड, अभय लहाने, प्रा. के. के. कदम, किशोर भांडवले, दिपक (बंडु) शिंदे, कपिल ठाकुर, संतोष रोडगे, काशिनाथ घुमरे, विष्णू काळे, अन्सीराम लहाने, गजानन शेलार, अजय काष्टे, प्रमोद गायकवाड, रमेश मसुरे, मंगेश गाडगे, सुरेश शिंदे, सलमान सिद्दीकी, झिशन सिद्दीकी, समस्त शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहकार्य करत आहेत.