सेलूतील यशवंत विद्यालयात आज विभागीय कथाकथन स्पर्धा
हेलस साने गुरूजी कथामाला, मानस फाऊंडेशनचा उपक्रम
परभणी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस (ता.मंठा) आणि मानस फाऊंडेशन, जालना आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धा अंतिम फेरी शुक्रवारी, १९ जानेवारी रोजी सेलू (जि.परभणी) येथील यशवंत विद्यालयात सकाळी ११ वाजता होत आहे. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे तर बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेलू येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, प्रमुख पाहुणे म्हणून सचिव तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मानस फाऊंडेशनचे प्रमुख डाॅ.प्रकाश आंबेकर, डाॅ.सुहास सदाव्रते, आर.आर.जोशी, व्यंकटेश चौधरी, डाॅ.यशवंत सोनुने, यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे, रतन थटवले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, असे संयोजक तथा अध्यक्ष कल्पना दत्तात्रय हेलसकर, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे, बाबासाहेब हेलसकर, ईश्वरदास मोताळे यांनी कळविले आहे.