कलावंत घडविण्यात कलाशिक्षकांचे मोठे योगदान : रामप्रसाद घोडके; पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सेलूत सन्मान

कलावंत घडविण्यात कलाशिक्षकांचे मोठे योगदान : रामप्रसाद घोडके; पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सेलूत सन्मान

परभणी : शालेय जीवनात कला शिक्षकांचे काम हे विद्यार्थ्यांच्या कलेतून दिसते. कला शिक्षtक विद्यार्थ्यांना घडवून आकार देतात आणि त्यांच्यामुळे मुले विविध कला क्षेत्रात नावलौकिक करतात. कलावंत घडविण्यात कलाशिक्षकांचे मोठे योगदान असते, असे मत परभणी येथील आर.बी.घोडके इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक तथा उद्योजक रामप्रसाद घोडके यांनी व्यक्त केले.

सेलू येथे सोमवारी २२ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळाच्या सेलू शाखेच्या वतीने राज्यस्तरीय कलाध्यापक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मानप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे विभागीय उपाध्यक्ष माधव घयाळ, जिल्हाध्यक्ष केशव लगड, सचिव अतुल सामाले, सेलू कलाध्यापक संघाचे अध्यक्ष किशोर कटारे, मोहन बोराडे यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाची ४२ वी कला शिक्षक व परिषद पालघर या ठिकाणी आदर्श कलाध्यापक पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळकृष्ण केदारी व गोविंद शिंदे यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी माधव घयाळ यांनी विविध प्रकारच्या कला आणि त्यातून मिळणारे कला शिक्षण यावर सविस्तरपणे मार्गदर्शन करून विद्यार्थी कलागुणांना कसा वाव मिळेल आणि यात कला शिक्षकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. केशव लगड यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव केला. प्रास्ताविक किशोर कटारे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष ताल्डे यांनी केले. सच्चिदानंद डाखोरे,पांडुरंग पाटणकर, रोहिदास चव्हाण, सुनील मोरे, फुलसिंग गावित, महादेव बोरकर, मुसळे आदींसह कलाशिक्षक उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!