नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत बीडचा शेकाप संघ विजेता; सीसी मालेगाव उपविजेता

नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत बीडचा शेकाप संघ विजेता; सीसी मालेगाव उपविजेता

विजेता शेकाप बीड संघास एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक आमदार मेघना बोर्डीकर यांच्या वतीने, तर चषक नामदेव आप्पा डख यांच्या वतीने देण्यात आले. व्दितीय पारितोषिक मालेगाव संघास रोख ७१ हजार रुपये पारितोषिक सभापती पंकज आंबेगावकर यांच्या वतीने, तर मालिका वीर मालेगावच्या इम्रान गेल यास २१ हजार रोख पारितोषिक पारस काला व चषक यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत बीडचा शेकाप संघ विजेता; सीसी मालेगाव उपविजेता

सेलू : सेलू तालुका क्रिकेट संघटना व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व.नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत शेकाप बीड संघ विजेता ठरला. तर सीसी मालेगाव संघ उपविजेता ठरला आहे.
नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी अंतिम सामना झाला. विजेत्यांना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी आचार्य ओम रामेश्वरजी महाराजांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने, साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे, नामदेव आप्पा डख, मोहन अग्रवाल, माजी उप नगराध्यक्ष संदिप लहाने, उदय बोराडे, अजय डासाळकर, परमेश्वर आकात, एकनाथ वाटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मोहन बोराडे, तर आभार राजेश राठोड यांनी मानले‌. विजेता शेकाप बीड संघास एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक आमदार मेघना बोर्डीकर यांच्या वतीने, तर चषक नामदेव आप्पा डख यांच्या वतीने देण्यात आले. व्दितीय पारितोषिक मालेगाव संघास रोख ७१ हजार रुपये पारितोषिक सभापती पंकज आंबेगावकर यांच्या वतीने, तर मालिका वीर मालेगावच्या इम्रान गेल यास २१ हजार रोख पारितोषिक पारस काला व चषक यांच्या वतीने देण्यात आले.
पंच म्हणून सय्यद जमशेद, गंगाधर शेवाळ, गुणलेखक सलमान सिद्दीकी, प्रमोद गायकवाड, समालोचक, शेख यासेर, विजय वाघ,पवन फुलमाळी, मोईन शेख, वैभव सरकटे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक गणेश माळवे, प्रा.नागेश कान्हेकर, अविनाश शेरे, पांडुरंग कावळे, संदीप लहाने, राजेश राठोड, संतोष रोडगे, अभी चव्हाण, मसूद अन्सारी, प्रमोद गायकवाड, गजानन शेलार, दीपक निवळकर, झिशान सिद्दीकी, मोईन शेख, मोसीन सय्यद, अजय काष्टे, मंगेश गाडगे, सुरज शिंदे, वैभव सरकटे, माझ अन्सारी, श्रीशैल्य फटाले, आदित्य आडळकर, बंटी सोळंके, नाविद शेख, फाजील बागवाण, कफील बागवान, कपिल ठाकूर, सोनाजी पौळ, आलीम पठाण, श्लोक लिंगे आदींसह संयोजन समिती व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!