नूतन विद्यालयातील शिक्षक लक्ष्मण वांगे यांचा सेवागौरव
सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालयातील जेष्ठ शिक्षक लक्ष्मण प्रभाकरराव वांगे यांचा सेवानिवृत्ती निमित्त बुधवारी, ३१ जानेवारी रोजी सपत्नीक सेवा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. चिटणीस प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर, दत्तरावजी पावडे, प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, अनिता वांगे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिक्षक सुरेश हिवाळे, माजी विद्यार्थी योगेश खंदारे, प्राचार्य कोठेकर, पावडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. श्री.वांगे यांनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सच्चिदानंद डाखोरे यांनी स्वागत गीत गायीले. प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विजेंद्र धापसे यांनी केले. संतोष मलसटवाड यांनी आभार मानले.