मराठा आरक्षण : सेलूचे तहसीलदार झांपले यांच्याकडून सर्वेक्षणाची स्थळ पाहणी
सेलू जि.परभणी : शहरामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण सर्वेक्षणाची स्थळ पाहणी तहसीलदार दिनेश झांपले यांनी केली. सर्वेक्षण सुरू असतांंना तहसीलदार दिनेश झंपले यांनी श्रीराम कॉलनीमध्ये भेट दिली. या ठिकाणी नरेंद्र झालटे यांची मराठा आरक्षण सर्वेक्षण मध्ये माहिती घेण्यात आली. प्रगणक कशा पद्धतीने काम करीत आहेत, याची प्रत्यक्ष पाहणी झांपले यांनी केली. याप्रसंगी प्रगणक विष्णू वामन, रवि गिरी, डॉ.संतोष मलसटवाड उपस्थित होते.