आमदार मेघना बोर्डीकरांच्या प्रयत्नातून रस्त्याचा प्रश्न मार्गी; सेलूतील प्रभाग सहामध्ये रस्ता कामाचे भूमीपूजन
सेलू जि.परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील वालूर नाका ते जिल्हा परिषद शाळा या रस्त्याचा गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार मेघना बोर्डीकरांच्या प्रयत्नातून १३१ मीटर सिमेंट काँक्रिटी रस्ता कामासाठी २० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला. ॲड.संजय लोया यांच्या हस्ते गुरुवारी (ता.०१) कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक ॲड. दत्तराव कदम, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, माजी नगरसेवक शिवाजीराव खेडकर, दिगंबर गोरे, ज्ञानेश्वर महाराज, सोपान चव्हाण, सुरेश खेत्रे, ढोबळे महाराज, गणेश गोरे, भारत पवार, वहीदभाई, कृष्णा गोरे, शेख शफिक, पाशाभाई आदींची उपस्थिती होती. सदरील रस्ता अनेक वर्षापासून खराब झाला होता. रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले होते. त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत होती. आमदार मेघना बोर्डीकर यांनी रस्त्याची अडचण लक्षात घेऊन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी २० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून आणला होता. यातून १३१ मीटर सिमेंट काँक्रिटीकरण करून रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे रहदारीचा प्रश्न सुटणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.