हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब : मानाच्या संदलने परभणीच्या ऊरूस यात्रेची सुरुवात

हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब : मानाच्या संदलने परभणीच्या ऊरूस यात्रेची सुरुवात

परभणी : येथील महान सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उरूस यात्रेला गुरूवारी सदंल मिरवणुकीने उत्साहात सुरूवात झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरातून मिरवणूक सुरू झाली.जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संदलचा तबक डोक्यावर घेतला होता. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर., वक्फ मंडळाचे विभागीय अधिकारी व उरुस समितीचे व्यवस्थापक खुसरो खान, जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद अमिनुज्जमा आदी उपस्थित होते. सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांची परभणी येथील दरगाह सर्व धर्म समभावाचे, एकात्मतेचे प्रतिक असून, सर्व जिल्हावासियांची श्रध्दास्थान आहे. मागील ११६ वर्षापासून मानाच्या संदलची परंपरा आजतागायत कायम असून, या यात्रेला देश व राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. नागरिकांनी या उरूस उत्सवात सहभागी होवून कायदा व सुव्यवस्थाचे पालन करून शांततेत पार पाडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!