जयश्री काळे यांची एमपीएससीद्वारे निवड; माजी आमदार भांबळे यांनी केला गौरव
सेलू : आहेर बोरगाव येथील माजी सरपंच शिवाजीराव काळे यांची कन्या जयश्री शिवाजी काळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय या विभागातील वरिष्ठ लिपिकपदी निवड झाली. माजी आमदार विजय भांबळे यांनी काळे यांच्या घरी भेट देऊन जयश्रीचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी सुधाकर रोकडे, शिवराम कदम, सोपान कदम, मुकुंद लहाने, माऊली पवार, बालासाहेब लीपने, भागवत लीपने, बाळासाहेब लहाने, आबासाहेब बिडवे, विजय चाळके, श्री गोरे आदींची उपस्थिती होती.