सेलूतील नूतन विद्यालयाचे आज स्नेहसंमेलन

सेलूतील नूतन विद्यालयाचे आज स्नेहसंमेलन

जय जय स्वामी समर्थ मालिकेचे दिग्दर्शक दिगंबर फासाटे, अभिनते अनुज ठाकरे यांची उपस्थिती 

सेलू : येथील नूतन विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तथा जय जय स्वामी समर्थ मालिकेचे दिग्दर्शक दिगंबर फासाटे व अभिनते अनुज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया असतील. याप्रसंगी उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या वेळी विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक संतोष पाटील व संयोजन समितीने केले आहे.


फुलांसारखे सुगंधी होतांना… वर्तमानपत्र वाटप्या ते दिग्दर्शक : ‘नूतन’ चा माजी विद्यार्थी दिगंबर सुधाकर फासाटे यांचा प्रेरक प्रवास 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!