रेखाकला परीक्षेत प्रॉस्परस पब्लिक स्कूलचे यश
सेलू: श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत इंटरमीडिएट व एलेमेंटरी परीक्षेत यश मिळवले आहे. क्षितिजा खजिने हीने ए ग्रेड, तर मयुरी पारधे, संचिता लहाने या विद्यार्थ्यांनी बी ग्रेड प्राप्त केला. शाळेचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, मुख्याध्यापिका प्रगती क्षिरसागर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षकांची उपस्थिती होती. परीक्षेसाठी क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.