डिजीटल आर्थिक साक्षरता गरजेची : सुनील हट्टेकर; नूतन कन्या प्रशालेमध्ये कार्यक्रम
सेलू : विद्यार्थीनीनी काळाची गरज ओळखता डिजिटल आर्थिक साक्षरता, गुंतवणुकीचे महत्त्व समजून घ्यावे. बचतीची सवय अंगीकारणे आवश्यक आहे, असे मत आर्थिक साक्षरता सल्लागार प्रमुख सुनील हट्टेकर यांनी केले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत नूतन कन्या प्रशालेमध्ये आयोजित ‘आर्थिक साक्षरता काळाची गरज’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारणी सदस्य दत्तराव पावडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेलू शाखाधिकारी पाटील, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भविष्यात करावयाची बचत, गुंतवणूक, गुंतवणुकीतील संभाव्य फसवेगिरी यासंदर्भात हट्टेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. श्री.पाटील यांनी बँकेचे व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी यासंदर्भात मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले. भालचंद्र गांजापुरकर यांनी आभार मानले.