नूतन प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
सेलू : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत येथील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेमध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष राजेश गुप्ता, मकरंद दिग्रसकर, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. छाया पाचलेगाकर, अनिल रत्नपारखी, भुलंगे,ॲड.पौर्णिमा जोहीरे, मेघा चौधरी, श्रीवास्तव आदींनी मनोगत व्यक्त केले.