विविध परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार; श्रीराम प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित, प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये प्रेसिडेंशिअल -२, एनएसओ व एलिमेंटरी, इंटरिजिएट आदी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, नारायण मोगल, चंदेल, योगिता खेबाळे व शिक्षक उपस्थित होते. एनएसओ परीक्षेमध्ये नऊ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व एलिमेंटरी, इंटरिजिएट परीक्षेमध्ये १८विद्यार्थ्यानी 100% निकाल देऊन घवघवीत यश मिळवले. डॉ.संजय रोडगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.