तीस वर्षांनी वर्ग मैत्रिणी रमल्या शाळेच्या प्रांगणात; नूतन कन्या शाळेत मेळावा

तीस वर्षांनी वर्ग मैत्रिणी रमल्या शाळेच्या प्रांगणात; नूतन कन्या शाळेत मेळावा

आमच्या यशाच्या, ध्येयाच्या पाठीशी आमची नूतन कन्या प्रशालेतील गुरूजन भक्कम पाठीशी होते. त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीच्या जोरावरच आम्ही आमचे उचित ध्येय साध्य करू शकलो, असे मत नूतन कन्या प्रशालेतील माजी विद्यार्थीनी वंदना कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

सेलू : येथील नूतन कन्या प्रशालेत १९९३ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थीनी मेळावा नुकताच उत्साहात साजरा झाला. 
याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, नूतन विद्यालयचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर, सेवानिवृत्त शिक्षक नारायण इककर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रशालेच्या जयश्री लोसरवार, अनिता देशमुख, मिनाक्षी काटकर, वंदना कुलकर्णी, मीरा जोशी, मुरारी राजमनी, लता गिलडा, स्नेहा राठी, मनीषा कुलकर्णी, प्रज्ञा देशपांडे, आश्विनी दांडेकर, सुनीता मालाणी, शेख बेगम यांनी प्रशालेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.  सूत्रसंचालन शशिकांत देशपांडे यांनी तर आभार कीर्ती राऊत यांनी मानले. अनंत बोराडे, सुरेखा आगळे, किशोर ढोके, विनोद शिंदे यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!