आहेर बोरगावच्या नितीन विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
सेलू जि.परभणी : आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मुकुंद राजेंद्र लहाने, पांडुरंग लाडाने राजेभाऊ चव्हाण, आबासाहेब बिडवे, शिवाजी काळे, चेतन खरात कैलास पुंगळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.