आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन; सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम
परभणी : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तहसीलदार श्रीराम बेंडे, प्रशांत वाकोडकर यांची उपस्थिती होती. जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पूजन केले. सेलूतील नूतन विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी जांभेकर यांच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. काशीनाथ पल्लेवाड यांनी जांभेकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. पी.टी.कपाटे, शिल्पा बरडे आदींची उपस्थिती होती.