मंदगती दुचाकी स्पर्धेत मुकुंद, शुभम, कृष्णा काळे विजेते; शिवजयंतीनिमित्त भाजपचा सेलूमध्ये उपक्रम

मंदगती दुचाकी स्पर्धेत मुकुंद, शुभम, कृष्णा काळे विजेते; शिवजयंतीनिमित्त भाजपचा सेलूमध्ये उपक्रम

जीवनात वेगवान गतीमुळे अनेकवेळा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. परंतु, यश मिळवण्यासाठी अनेक वेळा हळूवार गती फलदायी ठरते. म्हणून गतीचे महत्त्वाचे युवकांनी अनुकरण करावे, असे आवाहन डॉ.संजय रोडगे यांनी या वेळी केले.

सेलू जि.परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर मंदगती दुचाकी स्पर्धा (Slow Motorcycle Race) आयोजिण्यात आली होती. यामध्ये मुकुंद डासाळकर यांनी प्रथम, शुभम काळबांडे द्वितीय, तर कृष्णा काळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. नागेश सरकटे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अर्जुन बोरूळ व मित्र मंडळाच्या वतीने मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उद्घाटक म्हणून सेलू बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे उपस्थित होते. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, संजय लोया, प्रसाद खारकर, विठ्ठल कोक्कर, शिवहारी शेवाळे, भागवत दळवे, गणेश काटकर, कपील फुलारी, गायके, बाळासाहेब काजळे, ईश्वर तावरे आदींची उपस्थिती होती. स्पर्धेत शहरातील ५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेत्यांना आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या वाढदिवशी अनुक्रमे प्रथम पारितोषिक ७७७७ रुपये, द्वितीय ५५५५ रुपये, तर तृतीय ३३३३ रूपये रोख पारितोषिके व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. अर्जुन बोरूळ यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सुनील राठोड, शुभाष खंदारे, अभय महाजन, संदीप बोकन, राजू रणशिंगे, गोविंद खराबे, गोविंद हरणे, कृष्णा बोरुळ, कृष्णा चव्हाण, पंकज वायाळ, गोपाळ लहाने, प्रकाश शेरे, दत्ता पवार आदींनी परीश्रम घेतले.

मंदगती दुचाकी स्पर्धेत मुकुंद, शुभम, कृष्णा काळे विजेते; शिवजयंतीनिमित्त भाजपचा सेलूमध्ये उपक्रम

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!