शिक्षकांची पर्यवेक्षणासाठी अदलाबदल नको : आमदार विक्रम काळे

शिक्षकांची पर्यवेक्षणासाठी अदलाबदल नको : आमदार विक्रम काळे

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, परभणी जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाची मागणी

शिक्षकांची पर्यवेक्षणासाठी अदलाबदल नको : आमदार विक्रम काळे  

परभणी : परभणी जिल्ह्यात दहावी-बारावीच्या परीक्षा अतिशय सुरळीत आणि कॉपिमुक्त वातावरणात होतात. त्यामुळे पर्यवेक्षण कार्यासाठी शिक्षकांची अदलाबदल करू नये. अशी मागणी छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे केली आहे. याविषयी आमदार विक्रम काळे यांनी शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, परीक्षा कॉपीमुक्त झालीच पाहिजे. मात्र, परीक्षेच्या पर्यवेक्षण कार्यासाठी शिक्षकांची अदलाबदली केल्याने शारिरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे इयत्ता दहावी-बारावीच्या परिक्षेसाठी शिक्षक पर्यवेक्षकाची अदलाबदल करण्यात येऊ नये. याबाबत संबंधितांना आदेशित करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

यासंदर्भात परभणी जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाने आमदार काळे यांना निवेदन दिले होते. शिक्षक पर्यवेक्षकाची अदलाबदली थांबवावी. आदेश रद्द करावेत. शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या शाळा-महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर नियुक्ती आदेश द्याव्यात, अशी मागणी केली होती.‌ राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा.मा.सुर्वे, केशव दुधाटे, माणिक अंधारे, प्रा.मगदुम, पी.आर.जाधव, रंजीत काकडे, रामप्रसाद अवचार, राम रेंगे, प्राचार्य पांडुरंग वाघ आदींसह पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!