मुलांनो, मोबाईलपासून दूर राहा : संजय मगर; सेलूतील जिजामाता विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात

मुलांनो, मोबाईलपासून दूर राहा : संजय मगर; सेलूतील जिजामाता विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात

सेलू जि.परभणी : येथील जिजामाता बाल विद्या मंदिरच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. बाल चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या वेळी मार्गदर्शन करतांना सेलू येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक संजय मगर म्हणाले,” मुलांनी देशी खेळ खेळावेत. शक्यतो मोबाईल पासून दूर राहात शैक्षणिक प्रगती करावी. ”

अध्यक्षस्थानी राजर्षि छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिकेत जोगदंड, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक संजय मगर, डॉ.ऋतुराज साडेगावकर, संस्था सचिव दिगंबरराव मुळे, बाबासाहेब चारठाणकर, डॉ. गोविंद डख, मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व वार्षिक अहवाल मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांनी सादर केला.डी. व्ही.मुळे यांनी संस्थेच्या वाटचाली बद्दल माहिती दिली. मुलांनी देशी खेळ खेळावेत व शक्यतो मोबाईल पासून दूर रहावे, असे प्रतिपादन संजय मगर यांनी केले. यावेळी स्नेहसंमेलन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी (कै.) पंडितकाका देशपांडे (चारठाणकर) स्मृती, (कै.) वनमाला साडेगावकर स्मृती, (कै.) माधवराव डख तसेच (कै.) विष्णुपंत व लक्ष्मीबाई यांचे स्मृती प्रित्यर्थ बक्षिसे जाहीर करण्यात आली. डॉ.अनिकेत जोगदंड यांनी अध्यक्षीय समारोपात विदयार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी अभ्यासाबरोबर क्रीडा स्पर्धेत यश संपादन करावे असे आवाहन केले. सूत्रसंचालन मंगेश शेळके व कृष्णकांत खापरखुंटीकर यांनी केले. भगवान पावडे यांनी आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!