विविध क्षेत्रांतील पुरस्कारप्राप्त नागरिकांचा सत्कार; सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात कार्यक्रम

विविध क्षेत्रांतील पुरस्कारप्राप्त नागरिकांचा सत्कार; सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात कार्यक्रम

सेलू जि.परभणी : सेलू् येथील महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे संचालित स्वामी रामानंद तीर्थ हिंदी – मराठी ग्रंथालयवतीने बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त नागरिकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष एम.आर.पटेल होते.‌ प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ.आसाराम लोमटे, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांचा बॅकिंग क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट चेअरमन पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल, तर राज्यसरकारचा उत्कृष्ट निर्यात उद्योजक पुरस्कार प्राप्त नंदकिशोरजी बाहेती, चेतनकुमार बाहेती, तसेच पक्षी निरीक्षक माणिक पुरी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी लोमटे म्हणाले, ” निसर्गाप्रती जागृत राहणे ही काळाची गरज असून, आपण जे कार्य करतो आहोत ते माणसांच्या हिताचे आणि निसर्ग संवर्धनाचे असले पाहिजे.” प्रास्ताविक सचिव प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन अनंत मोगल यांनी केले. तर माधव गव्हाणे यांनी आभार मानले. उद्योजक महेश खारकर, बाबासाहेब चारठाणकर, डॉ. गंगाधर गळगे, चंद्रशेखर मुळावेकर, सर्जेराव लहाने, महादेव आगजाळ, विलास शिंदे, पंडित जगाडे, सुरेश हिवाळे, शरद ठाकर, संजय विटेकर,अनिरुद्ध टाके आदींसह वाचक, नागरिकांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!