श्रीराम प्रतिष्ठान : सेलूतील सुरभि महोत्सवाचे थाटात उद्घाटन

श्रीराम प्रतिष्ठान : सेलूतील सुरभि महोत्सवाचे थाटात उद्घाटन

अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, संतोष बोबडे, डॉ.संजय रोडगे  यांची उपस्थिती

सेलू जि.परभणी :  येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभी महोत्सवाचे उद्घाटन परभणी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, परभणी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोबडे यांच्या हस्ते शनिवारी (24 डिसेंबर) झाले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप टाक, माजी नगरसेवक मनीष कदम, रवळगावचे सरपंच दिपक रोडगे,बाबासाहेब भाबट, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य प्रा. कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, प्रा.अशोक बोडखे, डॉ.मीनाक्षी रत्नपारखी, डॉ नीलिमा सिंग, डॉ.बबन सोनवणे प्रा.गणेश सोळंके, शालिनी शेळके, प्रा.करणसिंग चव्हाण रोज मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम प्रतिष्ठानचा ध्वजारोहण व मशाल पेटवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर एल.के. आर.आर.प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय, प्राॅस्परस पब्लिक स्कूल, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, अपूर्वा पॉलिटेक्निक, डॉ. राम रोडगे डी.एड व बी. एड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने पथसंचलन सादर केले. विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी ड्रील, एरोबिक्स, डंबेल्स, झुम्बा डान्स, म्युझिकल ड्रिल, लेझीम कराटे, वंदे मातरम थीमचे अंत्यत आकर्षक पद्धतीने चिमुकल्यांनी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.सूत्रसंचालन संजय ठाकरे यांनी केले.

खेळातून खेळाडू वृत्ती निर्माण होते : डॉ प्रताप काळे

डॉ.संजय रोडगे यांनी श्रीराम प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शैक्षणिक व सामाजिक कार्य केल्याचे आज या विद्यार्थी रूपी वटवृक्षातून दिसुन येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल मी अभिनंदन करतो.पालकांनी आपल्या पाल्यांना विविध स्पर्धेत सहभागी केले पाहिजे. खेळातून विद्यार्थ्यांची खिलाडूवृत्ती निर्माण होते असे प्रतिपादन डॉ. प्रताप काळे यांनी केले.

हेही वाचा : सानेगुरुजी जयंती : विद्यार्थ्यांनी सुरात गायली ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना

हेही वाचा : सानेगुरूजी जयंती : रांजणीच्या सरस्वती भुवन प्रशालेत गीतगायन, कथाकथन रंगले

हेही वाचा : श्रीराम प्रतिष्ठान : सेलूतील सुरभि महोत्सवाचे थाटात उद्घाटन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!