प्रजासत्ताक दिन : ‘हर घर नर्सरी’ अभियानाचा सेलूत शुभारंभ
सेलू नगर परिषद व मोरया प्रतिष्ठानचा उपक्रम, १५ ऑगस्टपर्यंत राबविणार अभियान, सहभाग नोंदविण्याचे नागरिकांना आवाहन
सेलू : सेलू नगर परिषद व मोरया प्रतिष्ठान यांच्या वतीने सेलू शहरातील नागरिकांसाठी ‘हर घर नर्सरी’ अभियानाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी गुरूवारी, २६ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक अरूणा संगेवार यांच्या हस्ते वृक्ष पूजन व रोपांच्या बिया लावून करण्यात आला. या अभियानात सेलू शहरातील सर्व कुटुंबांनी सक्रिय सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षणासाठी हर घर नर्सरी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.नगर परिषदेच्या वतीने नोंदणी केलेल्या नागरिकांना मोफत वृक्ष बिया व साहित्य देण्यात येणार असून, परीक्षकांनी निवड केलेल्या कुटुंबाला नगर परिषदेच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी सांगितले.या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यासह मान्यवरांची उपस्थिती होती. हर घरी नर्सरी अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांना वृक्ष बिया व साहित्याचे वाटप हुतात्मा स्मारक येथून करण्यात येणार असून, नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी येथे क्लिक करून करावी. जेणेकरून २६ जानेवारी ते १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणाऱ्या हर घर नर्सरी अभियानात अधिकृत सहभाग नोंदवला जाईल व त्यापैकी निवडक कुटुंबांचा सन्मान केला जाईल, अशी माहिती मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी यावेळी दिली. कार्यक्रमासाठी नगर परिषदेचे श्री कापुरे, कापसे,नवघरे व मोरया प्रतिष्ठानचे सुजित मिटकरी, सदाशिव बर्वे,विनोद भगत आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.
हर घरी नर्सरी अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांना वृक्ष बिया व साहित्याचे वाटप हुतात्मा स्मारक येथून करण्यात येणार असून, नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी येथे क्लिक करून करावी. जेणेकरून २६ जानेवारी ते १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणाऱ्या हर घर नर्सरी अभियानात अधिकृत सहभाग नोंदवला जाईल व त्यापैकी निवडक कुटुंबांचा सन्मान केला जाईल, अशी माहिती मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी यावेळी दिली.