Inspirational :  रांगोळीतून दिला सामाजिक संदेश; रायपूरचे शिक्षक माधव गव्हाणे यांचा उपक्रम

Inspirational :  रांगोळीतून दिला सामाजिक संदेश; रायपूरचे शिक्षक माधव गव्हाणे यांचा उपक्रम

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात लाकडाच्या भुशापासून रांगोळी, थोर महिलांच्या माहितीचे प्रदर्शन

सेलू,जि.परभणी : तालुक्यातील रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक माधव गव्हाणे यांच्या संकल्पनेतून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात लाकडाच्या भुशापासून साकारलेल्या रांगोळी व प्रदर्शनातून ‘मुलींना जपा आणि त्यांना शिकवा’ असा सामाजिक संदेश दिला. हे प्रदर्शन पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

दरवर्षी माधव गव्हाणे नवनवीन संकल्पनेतून प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन साजरा करतात. या वर्षी भारताच्या इतिहासात आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या वीस भारतीय महिलांच्या कार्याच्या माहितीचे प्रदर्शन शाळेत भरविण्यात आले होते. मुलींना योग्य शिक्षण आणि संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाही हे दाखवून देणे हा प्रदर्शनाच्या उद्देश होता. सद्यस्थितीत सामाजिकदृष्ट्या मुली आणि महिलांची ज्याप्रमाणे प्रतारणा होत आहे. केवळ भोगण्याची वस्तू म्हणून त्यांच्याकडे पहिल्या जात आहे.  त्यातून महिलांमध्ये सामाजिक असुरक्षिततेची भावना वाढली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे मुलींच्या जन्माला होणारा विरोध ही चिंतेची बाब आहे. माधव गव्हाणे यांनी हीच संकल्पना डोळ्या समोर ठेवत, ‘मुलींना जपा आणि त्यांना शिकवा.’ हाच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. या साठी त्यांनी लाकडाच्या भुशा पासून रांगोळी आणि कार्ड बोर्डवर फ्लेक्सच्या मदतीने थोर महिलांची माहिती चितारून अगदी सुंदर पद्धतीने ती शाळेच्या प्रांगणात मांडली. त्यांच्या या प्रयत्नाला गावकऱ्यांची सुध्दा मोलाची साथ मिळाली. गव्हाणे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रांगोळी प्रदर्शन

‘मुलींना जपा आणि त्यांना शिकवा.’ हाच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न रांगोळीच्या माध्यमातून केला आहे. या साठी त्यांनी लाकडाच्या भुशा पासून रांगोळी आणि कार्ड बोर्डवर फ्लेक्सच्या मदतीने थोर महिलांची माहिती चितारून अगदी सुंदर पद्धतीने ती शाळेच्या प्रांगणात मांडली. त्यांच्या या प्रयत्नाला गावकऱ्यांची सुध्दा मोलाची साथ मिळाली. माधव गव्हाणे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा : प्रजासत्ताक दिन : जिल्हा बालविवाहमुक्तीसाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक : जिल्हाधिकारी आंचल गोयल 

हेही वाचा : प्रजासत्ताक दिन : प्रिन्स, प्रॉस्परस, ज्ञानतीर्थ विद्यालयात विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

हेही वाचा : श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमाला : हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा धगधगता वारसा समजून घेण्याची गरज

हेही वाचा : Motivational : सशक्त पिढीच सशक्त समाज घडविते

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!