नितीन चषक क्रिकेट स्पर्धा : विजेतेपदासाठी विराट नांदेड व तुळशी परभणीमध्ये रविवारी अंतिम सामना

नितीन चषक क्रिकेट स्पर्धा : विजेतेपदासाठी विराट नांदेड व तुळशी परभणीमध्ये रविवारी अंतिम सामना

नांदेड संघाच्या संदीप पाटील खांडेकरला सामनावीर पुरस्कार

सेलू : सेलू तालुका क्रिकेट संघटना व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त २१ जानेवारीपासून आय़ोजित नितीन चषक राज्यस्तरीय निमंत्रितांच्या क्रिेकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी विराट नांदेड व तुळशी परभणी संघामध्ये रविवारी (२९ जानेवारी) अंतिम सामना रंगतदार ठरणार आहे.

शनिवारी,२७ जानेवारी रोजी नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर उपांत्य फेरीचा पहिला सामना
मालेगाव विरुद्ध तुळशी परभणी सामन्यात परभणी संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद १६७ धावा केल्या. वैभव लांडे ३७ धावा, पुरोहित भारत ४२, तर जयदिप भराडेने २१ धावा केल्या. मालेगाव संघाचा भेदक मारा मुजम्मील खान व अझर अन्सारी १-१ गडी, तर अबु सादने २ गडी बाद केले.
१६७ धावांचे प्रतिउत्तरात मालेगाव संघाने २० षटकात ९ बाद १२८ धावा केल्या. यात नदीम अन्सारी ३१ , इरफान शेख २३, सलीक अन्सारी २३ धावा केल्या, तर  परभणी संघाच्या वतीने भेदक मारा अमन भादोरीया ३ गडी तर जयदिप भराडे, आकाश कॉम्बो, पुरोहित भारत प्रत्येकी २-२ गडी बाद करून ३९ धावांनी दणदणीत विजय प्राप्त करत अंतिम फेरीत दाखल झाला.

दुपारच्या सत्रात दुसरा उपांत्य फेरीत विराट सी.ए. नांदेड व शेफक बीड संघात सामना झाला. साईबाबा बॅंकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. या प्रसंगी बॅंकचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, प्रभाकर सुरवसे, दत्तराव आंधळे, विनोद तरटे, कासीमभॉई, संयोजक गिरीष लोडाया हे उपस्थित होते. विराट नांदेडच्या संघाने २० षटकात १६२ धावा करत सर्वबाद झाले. यात यश यादव २२ धाव संदिप पाटील २४, शहाबाज काझी ४९, तर उबेद खान २८ योगदान दिले.
बीड संघाच्यावतीने गोलंदाजीचा मारा करतांना सय्यद सरफरोज व मोहमंद वासीम याने २-२ गडी बाद केले. तर मुद्दस्सर मुल्लाने ३ गडी बाद केले. १६२ धावांच्या प्रतिउत्तरात शेफक बीड २० षटकात १४५ धावांत सर्व गडी बाद झाले. यात मुयोद्दीन शेख ३६, असिफ खान २५, प्रदिप जगदाळे १६, अजय काळे १८ धावांचे योगदान देऊ शकले. विराट नांदेड संघाच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजी संदिप पाटील ४ गडी,व शाहरुख काझी ३ गडी बाद करून १७ धावांने विजय खेचून आणला.व अंतिम फेरीत प्रवेश केला.
सामनावीर पुरस्कार नांदेड संघाच्या संदीप पाटील खांडेकर यास १ हजार रोख व चषक ऑर्किड मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल डॉ.इम्रान कुरेशी यांच्या वतीने सामनावीर पुरस्कार रोख १००० रु देण्यात आला, या प्रसंगी ओमप्रकाश तोष्णीवाल, रवि कुलकर्णी, नितीन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने आदींची उपस्थिती होती.
सचिव संदीप लहाने, विनायक खंडागळे, पांडुरंग कावळे, अविनाश शेरे, स्पर्धा संयोजक गिरीश लोडाया, नागेश कान्हेकर, सहसंयोजक हरिभाऊ काळे, गणेश माळवे, बंडु देवधर यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमाला : हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा धगधगता वारसा समजून घेण्याची गरज

हेही वाचा : Motivational : सशक्त पिढीच सशक्त समाज घडविते

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!