सन्मान : सेलूतील साईबाबा बॅंकेतर्फे हाजी शफीक अली खान यांचा सत्कार
बॅंकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम
सेलू : येथील हाजी शफीक अलिखान रफिक अलिखान यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुलीच्या लग्नात पाच गरजू कुटुंबातील मुलींचा विवाह सोहळा उत्साहात केला. याबद्दल शनिवारी (२८ जानेवारी) शफिक अलिखान यांचा सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्याहस्ते शनिवारी (२८ जानेवारी ) सत्कार करण्यात आला.
साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या जन्मदिनाचे औचित्यसाधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. हाजी शफीक अलिखान यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून तसेच मक्का मदिनाची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी माजी नगराध्यक्ष पवनआडळकर, माजी नगरसेवक संभाजी पवार, विनोद तरटे, मुफीज भाई, मुश्ताक रब्बानी, ओम तोष्णीवाल, शेख इम्रान, इमित्याज अली खान, शेख इम्रान, शेख इरफान, राजेश गुप्ता, राजेंद्र आडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, दत्तात्रय पौळ, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, दत्तात्रय आंधळे, मोहसीन मामू, मोहंमद इलियास, निसार पठाण, संदीप आडळकर, शेख अझर, इसाक भाई आदींची उपस्थिती होती
हाजी शफीक अलिखान रफिक अलिखान यांची मुलगी बिबी महेनुर हिचा परभणी येथील महाराष्ट्र युवक काँग्रेस माजी सरचिटणीस इरफान उर रहेंमान खान यांचा मुलगा फतिख अझान खान याच्या सोबत झाला. याच सोहळ्यात हाजी शफीक अलिखान यांच्या पुढाकाराने पाच गरजू कुटुंबातील मुलीचे विवाह करण्यात आले होते. यातील तीन मुलीला पित्याचे छत्र नव्हते व दोन मुलींचे पालक आर्थिक दुर्बल व रोज मजुरी करणारे होते. या कुटुंबाना हाजी शफीक अलिखान यांच्या सामाजिक दायित्वामुळे मोठा आधार मिळाला. याच दखल घेत साईबाबा बॅंकेतर्फे हाजी शफीक अलिखान यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.