जगद्गुरु संत तुकाराम महाराज : जन्मोत्सवानिमित्त डिग्रस येथे रविवारपासून विविध कार्यक्रम

जगद्गुरु संत तुकाराम महाराज : जन्मोत्सवानिमित्त डिग्रस येथे रविवारपासून विविध कार्यक्रम

संगीतमय गाथा, कीर्तनाचे आयोजन, चार दिवस चालणार कार्यक्रम

सेलू : तालुक्यातील डिग्रस जहांगीर येथे समाज प्रबोधक जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 415 व्या जयंती निमित्त रविवारपासून (29 जानेवारी) समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  दोन फेब्रुवारीपर्यंत ‘सत्यवाणी तुकोबांची’ या विषयावर दररोज दुपारी 1 ते 4 या वेळेत गाथाचार्य गंगाधर महाराज कुरुंदकर (हिंगोली) संगीतमय तुकाराम गाथा निरूपण  करणार आहेत. रोज रात्री 8 ते 10 या वेळेत ‘वारकरी चळवळ व समाज परिवर्तन’ या विषयावर महाराष्ट्रातील वैभव शेटे, नितीन सावंत,गणेश कापशीकर ज्ञानेश्वर महाराज वाबळे (पुणे), मधुकर महाराज (नांदेड) आदी नामावंत समाज प्रबोधक कीर्तनकांराचे कीर्तन आयोजित केले आहे. नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन जगद्गुरु तुकाराम महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


हेही वाचा : सन्मान : सेलूतील साईबाबा बॅंकेतर्फे हाजी शफीक अली खान यांचा सत्कार

हेही वाचा : नितीन चषक क्रिकेट स्पर्धा : विजेतेपदासाठी विराट नांदेड व तुळशी परभणीमध्ये रविवारी अंतिम सामना

हेही वाचा : श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमाला : हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा धगधगता वारसा समजून घेण्याची गरज

हेही वाचा : Motivational : सशक्त पिढीच सशक्त समाज घडविते

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!