प्रयोगशाळा उद्घाटन : विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती निर्माण व्हावी : एसडीओ अरूणा संगेवार
सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात विज्ञान प्रयोगशाळा उद्घाटन
सेलू : तंत्रज्ञान समृद्ध युगात टिकायचे असेल, तर विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व जिज्ञासा वृत्ती निर्माण होणे क्रमप्राप्त आहे. असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांनी केले.
येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड अनिरूद्ध जोशी होते. प्रमुख अतिथी प्रकीर्ण भुपेंद्र राणा, संस्थेचे सचिव महेश खारकर, कोषाध्यक्ष ललित बिनायके, सदस्य जयंत दिग्रसकर, अभय सुभेदार, डॉ प्रवीण जोग, प्रवीण माणकेश्वर,
मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर, सुभाष नावकर आदींची उपस्थिती होती.लार्सन ॲन्ड टुब्रोचे शिक्षण संयोजक प्रकीर्ण राणा यांनी स्वयंप्रेरणेतून ही प्रयोगशाळा स्वखर्चाने उभारून दिली. त्याबद्दल संगेवार यांनी राणा यांचे कौतुक केले. प्रकिर्ण राणा यांनी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालायला दिलेल्या विज्ञान प्रयोगशाळा ही अत्यंत अत्याधुनिक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. या वेळी राणा यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड अनिरूद्ध जोशी यांनी देखील राणा यांचे आभार मानले व पुढील काळात संस्थेचा विकास हाच सर्वतोपरी असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव महेश खारकर यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर तर आभार मंगेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रकिर्ण राणा यांनी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालायला दिलेल्या विज्ञान प्रयोगशाळा ही अत्यंत अत्याधुनिक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे .या वेळी राणा यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
हेही वाचा : सन्मान : सेलूतील साईबाबा बॅंकेतर्फे हाजी शफीक अली खान यांचा सत्कार