निषेध : आव्हाडांच्या पुतळ्याला जोेडे मारून निषेध; भाजपाचे सेलूत आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज, प्रभु श्रीराम तसेच हिंदू देव-देवतांवर केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेध नोंदविला
सेलू : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभु श्रीराम तसेच हिंदू देव-देवतांवर केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या बस स्थानक संकुलातील कार्यालय परिसरात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके, ॲड. दत्ता कदम, भागवत दळवे, कपिल फुलारी, शिवहरी शेवाळे, दगडोबा जोगदंड, संदीप बोकन, नागेश ठाकूर, वैभव गाडेकर, गोविंद शर्मा, राजू सोळंके, पवन धुमाळ, सुनील चव्हाण, प्रकाश शेरे, महादेव गटकळ, प्रभाकर उकलकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा ; मासिक पाळी : श्रद्धा असावी; अंधश्रद्धा नको : डॉ.आशा चांडक यांचे मत, सेलूत कार्यशाळा
हेही वाचा : राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा : सेलूची नूतन कन्या सर्वप्रथम, खुदनापुरची ‘विद्याभारती’ द्वितीय