मागणी : सेलूतील वीरशैव समाजाच्या मागण्या तात्काळ मार्गी लावा; शिवा संघटनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मागणी : सेलूतील वीरशैव समाजाच्या मागण्या तात्काळ मार्गी लावा; शिवा संघटनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मागण्या मंजुरीसाठी पालिकेच्या वार्षिक अंदाज पत्रकात निधीची तरतूद करावी

सेलू : महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र नगर पालिकेच्या मुख्य सभागृहात लावण्यात यावे, महात्मा बसवेश्वरांची जयंती पालिका कार्यालय व पालिकेच्या शाळा बालवाड्या, वाचनालय आदी ठिकाणी साजरी करण्यात यावी. त्या करीता पालिकेच्या वार्षिक अंदाज पत्रकात निधीची तरतूद करावी आदींसह विविध मागण्यांचे निवेदन सेलू येथील शिवा संघटनेच्या वतीने मंगळवारी, सात फेब्रुवारी रोजी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे पालिकेच्या वीरशैव समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल महात्मा बसवेश्वर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करावे, महात्मा बसवेश्वरांच्या उपलब्ध असलेल्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी जागा उपलब्ध करून पुतळा प्रतिष्ठापना करावी व त्या परिसराचे सुशोभीकरण करावे. विविध मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे, तालुकाध्यक्ष निजलिंगआप्पा तरवडगे, विनोद भगत, शंकर राऊत, कैलास मलवडे, प्रदिप डफुरे, सुनीता डफुरे, बालासाहेब क्षीरसागर, कैलास मिटकर, अशोक मसुरे, बबन झमकडे, गणेश केशरखाने, सुनील नवघरे, रामदास पाटील, मनोहर चलवदे, गुरूबस पंचगल्ले, गणेश सुर्यवंशी, भारत स्वामी, दगडाया स्वामी, सुजीत मिटकरी, प्रकाश साखरे, नवनाथ सोनटक्के, ईश्वर चाकोते, देवराव चौरे आदींच्या सह्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे पालिकेच्या वीरशैव समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल महात्मा बसवेश्वर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करावे, महात्मा बसवेश्वरांच्या उपलब्ध असलेल्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी जागा उपलब्ध करून पुतळा प्रतिष्ठापना करावी व त्या परिसराचे सुशोभीकरण करावे. विविध मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा ; मासिक पाळी : श्रद्धा असावी; अंधश्रद्धा नको : डॉ.आशा चांडक यांचे मत, सेलूत कार्यशाळा

हेही वाचा : राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा : सेलूची नूतन कन्या सर्वप्रथम, खुदनापुरची ‘विद्याभारती’ द्वितीय

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!