बाजार समिती : पाथरीत सभापतीपदी अनिल नखाते, सोनपेठमध्ये सूर्यवंशी, परभणीत पंढरीनाथ घुले
सेलू/परभणी : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाचे पंढरीनाथ घुले, पाथरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल नखाते, तर सोनपेठमध्ये दशरथ सूर्यवंशी यांची सोमवारी निवड झाली आहे.
परभणी बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांच्या सोमवारी (२२ मे) झालेल्या बैठकीत सभापतीपदी पंढरीनाथ घुले, तर उपसभापतीपदी काँग्रेसचे अजय चव्हाण यांची चौदा विरूध्द चार मतांनी निवड झाली. या वेळी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार डॉ.राहुल पाटील, डॉ.विवेक नावंदर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सोनपेठ बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दशरथ सुर्यवंशी, उपसभापतीपदी उत्तम जाधव बिनविरोध निवड करण्यात आली. सोनपेठ बाजार समितीवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. पाथरी बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल नखाते यांचा बारा विरूद्ध सहा मतांनी दुसर्यांदा दणदणीत विजय झाला आहे. उपसभापतीपदी श्याम धर्मे यांची वर्णी लागली आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा नेतृत्वाखाली पाथरी बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नवनिवार्चित पदाधिकाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
सेलूतील रामदासी कीर्तन शिबिर उत्साहात; विविध पुरस्कारांचे वितरण
सेलूच्या सभापतीपदी चक्रधर पौळ, प्रकाश मुळे उपसभापती; विजयाचा महाविकास आघाडीकडून जल्लोष