५३४ पदवीधरांना प्रमाणपत्राचे वितरण
परभणी : येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील ५३४ विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांच्या हस्ते सोमवारी (२२ मे ) पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव होते. महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, डॉ.विजया नांदापुरकर आदींची उपस्थिती होती.
या वेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले, ” शिक्षणाने नम्रता येते. मानवी स्वभावातील घृणा, मत्सर, द्वेष कमी होऊन माणसाला जगण्याची ताकद मिळते. रोजगारासह विवेकशील माणूस घडविला जातो.” याप्रसंगी आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात फोटोग्राफीत पारितोषिकप्राप्त संकेत गाडेकर, महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त वैष्णवी कदम यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.शेख एम.ए.रहेमान, सूत्रसंचालन डॉ.उत्कर्ष किट्टेकर, तर आभार डॉ.जयंत बोबडे यांनी मानले.
सेलूतील रामदासी कीर्तन शिबिर उत्साहात; विविध पुरस्कारांचे वितरण
सेलूच्या सभापतीपदी चक्रधर पौळ, प्रकाश मुळे उपसभापती; विजयाचा महाविकास आघाडीकडून जल्लोष