अनुराग हिवरे आयआयटीसाठी पात्र; सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलच्यावतीने सत्कार 

अनुराग हिवरे आयआयटीसाठी पात्र; सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलच्यावतीने सत्कार 

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी अनुराग उद्धव हिवरे याने आयआयटी ॲडव्हान्स परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. प्रवेशासाठी पात्र ठरला. या बद्दल शाळेतर्फे अनुराग व पालकांचा रविवारी, १८ जून रोजी यथोचित सत्कार करण्यात आला.

अनुराग उद्धव हिवरे याने संपूर्ण भारतातून १३०२ स्थान मिळवले आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते अनुराग हिवरे व पालकांचा सत्कार करण्यात आला.‌

अनुरागचे वडील उद्धवराव हिवरे म्हणाले, अनुराग हा नर्सरी पासून दहावीपर्यंत प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. अनुरागच्या यशामध्ये शाळेचा फार मोठा वाटा आहे. याप्रसंगी डॉ.संजय रोडगे यांनी अनुरागला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कायद्याचा धाक राहिलेला नाही : सेलूतील कार्यक्रमात नंदिनी चपळगावकर यांचे मत

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!