सेलूतील सौ.‌सावित्रीबाई बिहाणी नूतन शाळेतील सोयीसुविधांचे उद्घाटन

सेलूतील सौ.‌सावित्रीबाई बिहाणी नूतन शाळेतील सोयीसुविधांचे उद्घाटन

आरओचे शुद्ध पाणी, अद्ययावत संगणक कक्षाची सुविधा 

सेलू जि.परभणी : येथील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेतील शुद्ध पाणी (आरओ) तसेच अद्ययावत संगणक कक्षाचे गुरुवारी, २१ सप्टेंबररोजी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष मकरंद दिग्रसकर होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, राजेश गुप्ता, बी.बी.बिहाणी चॅरिटेबल ट्रस्टचे विजयकुमार बिहाणी, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष नंदलाल परताणी, सचिव नीलेश बिनायके, राजेंद्र मणियार, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वाल्मीक खुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.‌ बद्रिनारायण कमलकिशोरजी लोया आणि प्रकाशचंदजी बिनायके परिवाराच्या वतीने सर्व मुलांकरिता आरोचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. बी.बी.बिहाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाळेमध्ये १५ संगणकांचा समावेश असलेला अद्यावत संगणक कक्ष उभारण्यात आला आहे. व्यापारी असोसिएशनच्या वतीने १६ पंखे व ग्रंथालयासाठी कपाट उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे यांनी यावेळी दिली.‌ अध्यक्षीय समारोप मकरंद दिग्रसकर यांनी केला. सूत्रसंचालन चेतन पानझडे यांनी केले. सोनाली कुबरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अनिल रत्नपारखी, उल्हास पांडे , धनंजय महामुनी, अर्जून पंडित, संदीप खाटीकमारे, अमोल हळणे, सुशील डुकरे, सुनील चिनके तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.


Ganeshotsav : रविवारपासून सेलूत गणेशोत्सव व्याख्यानमाला; व्याख्यान, परिसंवाद, एकांकिका आदी भरगच्च कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!