अभ्यासासोबत मैदानी खेळ आवश्यक : डॉ.संजय रोडगे
सेलू तालुकास्तरीय शालेय सॉफ्टबॉल व व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात
सेलू जि.परभणी : सध्याच्या स्पर्धेच्या काळात अधिकाधिक मुले व पालकही अभ्यासावरच जास्त लक्ष केंद्रित करत आहेत, परंतु शरीर आणि मन सुदृढ असेल तरच अभ्यासात प्रगती करता येते, म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अभ्यासाबरोबरच मैदानावर खेळही आवश्यक आहे, असे मत श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी व्यक्त केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने प्रिन्स अकॅडमी, सेलू येथे आयोजित सेलू तालुकास्तरीय शालेय सॉफ्टबॉल व व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा १८ सप्टेंबररोजी उत्साहात झाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. उद्घाटक म्हणून गटविकास अधिकारी गणेश मंडलिक होते. प्रमुख पाहुणे संजय मुंढे (राज्य खो-खो मार्गदर्शक) जिल्हा सचिव प्रा. प्रसेनजित बनसोडे, तालुका क्रीडा केंद्रप्रमुख भित्ते, प्रशांत नाईक यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, सूत्रसंचालन जुलाह खुद्दूस तर सूरज शिंदे यांनी आभार मानले. पंच म्हणून जगदीश लहाने, स्वप्निल चव्हाण, संजय भूमकर, संतोष शिंदे, जुलाह खुडूस, नीलेश माळवे, अभिषेक चव्हाण, पार्थ जावळे, सत्यम बुरकुले यांनी काम पाहिले.शालेय जिल्हा सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचा अंतिम निकाल :- १४ ,१७ वर्षे मुले गटात प्रथम : नूतन विद्यालय सेलू, १४ मुले व्दितीय: जिल्हा परिषद प्रा.शा. पोरवड, परभणी .१७ मुले व्दितीय: हॉली इंग्लिश स्कूल जिंतूर,१४,१७ वर्षे मुली: प्रथम: नूतन कन्या प्रशाला सेलू, व्दितीय:१४ मुली व्दितीय: जिल्हा परिषद प्रा.शा.पोरवड, परभणी, १९ वर्षातील मुले: हॉली इंग्लिश स्कील जिंतूर,सेलू तालुका व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा अंतिम निकाल:१४ वर्षे मुले: प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू , व्दितीय: ज्ञानतिर्थ विद्यालय सेलू,१४ वर्षे मुली: प्रथम प्रास्परस इंग्लिश स्कुल सेलू,१७ वर्षे मुले: प्रथम: नूतन विद्यालय सेलू, व्दितीय: प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू,१७ वर्षं मुली : प्रथम : व्हिजन इंग्लिश स्कूल सेलू, १९ वर्षे मुले/मुली प्रथम : प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू,व्दितीय: शांताबाई नखाते आ.शा.वालूर
रविवारपासून सेलूमध्ये प्रबोधनाचा जागर; व्याख्यान परिसंवाद एकांकिका आदी कार्यक्रम