मानव विकास योजना : सेलूच्या शारदा विद्यालयातील मुलींना सायकल वाटप
शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे ,शासनाकडून शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी मानव विकास योजने अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात त्याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणातून राष्ट्रसेवा करावी असे आवाहन आमदार सौ मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
सेलू : येथील श्री संत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक मंडळ सेलू संचालित शारदा विद्यालयाच्या नवीन इमारत परिसरात आमदार बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण व मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थीनींना सायकल वाटप झाले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मुंजाभाऊ भिसे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव चंद्रप्रकाशजी सांगताणी, संचालक डॉ.ए.एम.डख, जयप्रकाशजी बिहाणी, सहसचिव सुनील डख, प्रल्हादराव कान्हेकर, दिपकराव खराबे, जीवनअप्पा तरवडगे, प्रफुल्लकुमार बिनायके, नंदकिशोर बहिवाल यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते ५० लाभार्थी विद्यार्थीनींना मानव विकास योजने अंतर्गत सायकल वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. माजी उपसभापती सुंदरराव गाडेकर, कपील फुलारी, गणेश काटकर, मयुर वाघ, बाळासाहेब काजळे, मुख्याध्यापक प्रदिप कौसडीकर, सय्यद जलाल भाई, सुनील गायकवाड, माता पालक आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर नावाडे, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे तर मुख्याध्यापक डी.डी.शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बी.आर.साखरे, भरत रोडगे, संतोष चारठाणकर, रोहिदास चव्हाण, अभिमान पाईकराव, विजय हिरे, संदीप जुमडे, उषा कामठे, सीमा उंडे, बालासाहेब टरपले, नानासाहेब भदरगे, विजय अंभुरे, भारती मुळे आदींनी परिश्रम घेतले.