जालना-नांदेड महामार्ग : …अन्यथा मुंबईला पायी दिंडी; सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा

जालना-नांदेड महामार्ग : …अन्यथा मुंबईला पायी दिंडी; सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा

उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन, आम्हाला कळविल्याशिवाय कार्यवाही नको,

Authored By Babasaheb Helaskr

सेलू,जि.परभणी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाचा भूसंपादन मोबदला बाबत पार्श्वभूमी कळावी या आशयाचे निवेदन संबंधित शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कार्यालयात सोमवारी (२१ नोव्हेंबर) दिले आहे. जोपर्यंत सकारात्मक विचार होत नाही व संपूर्णपणे निराकरण होत नाही. तो पर्यंत पुढील कोणताही कार्यवाही करू नये. यासंदर्भात लेखी स्वरूपात निराकरण झाले नाही, तर महामार्गातील संपूर्ण शेतकरी मुंबईला पायी दिंडी काढणार आहेत, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाच्या ७ अ च्या नोटीशी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. परंतु संबंधित भूसंपादन बाबत व मावेजा बाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गाचे जे आवार्ड तयार करणार आहात. जे गुणांक दोन वापरून चार व पाच मोबदला देणार आहात. त्याचे कच्चे तत्वतः मूल्यांकन संबंधीत शेतकर्‍यांना देण्यात यावे. प्रत्यक्ष शेतात जाऊन संयुक्त मोजणी झाली व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी फळबाळ, विहीर, शेड, घरे व इतर मालमत्तेची स्थळ पाहणी करून पंचनामे करून १६ अ तयार केला तोच ग्राहय धरण्यात येऊन सदर मालमत्तेचे मूल्यांकना बाबत शेतकर्‍यांना कच्चा आराखडा द्यावा.

जर जिओग्राफीकली गुगल मॅपचा सर्वे गृहीत धरणार असाल तर त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. गुगल इमेज प्रत्येक वेळेस बदलत असल्याने त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा गुगल इमेजवर विश्वास नाही व त्याला कायदेशीर आधार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याला सक्त विरोध आहे.

संबंधीत ९ अधिकाऱ्याच्या संयुक्त टिमने जी शेतात येवून प्रत्यक्ष मोजणी झाली तेच ग्राहय धरून आवार्ड मध्ये समाविष्ट करावे. त्याच्या मावेजा बाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. शेतकऱ्यांना चालू बाजार भावा प्रमाणेच व भविष्यातील नुकसानीचा विचार करता मोबद्दला देण्यात यावा. जमीनीची गुणवत्ता तपासून तिन्ही कॅटेगीरीमध्ये मोबदला देण्यात यावा जमीनीचे दोन तुकडे झालेल्या शेतकऱ्यांसाठी वहिवाटीचा प्रश्न उभा राहू शकतो व त्यांचे कायमस्वरूपी नुकसान होवू शकते. त्यासाठी अंडर पासची (खालून मार्ग) याची व्यवस्था करावी याबाबत प्रोजेक्ट डायरेक्टर यांना अवगत करावे. सदर महामार्गाची उंची ०७ ते ०८ मिटर असल्याचे समजले आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण होऊन भविष्यात वाद निर्माण होवू शकतात. तरी शेतकऱ्यांना दळणवळणासाठी सर्विस रोडची तरतूद करावी व या सर्व बाबतीत मागण्यांचा सकारात्मक विचार व्हावा. यासंदर्भात लेखी स्वरूपात निराकरण झाले नाही, तर महामार्गातील संपूर्ण शेतकरी मुंबई येथे पायी दिंडी काढणार आहेत. जोपर्यंत सकारात्मक विचार होत नाही व संपूर्णपणे निराकरण होत नाही तो पर्यंत आपण पुढील कोणताही कार्यवाही करू नये. जो पर्यंत संपूर्ण निराकारण होत नाही व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संपूर्ण शेतकरी हे त्यांच्या शेतजमीनीमध्ये कोणालाही येवू देणार नाहीत. याची दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रशांत नाईक, विजय खरात, रामेश्वर गाडेकर, गणेशराव मुंडे, रघुनाथ टाके,  ज्ञानदेव चव्हाळ, नवनाथ टाके,  प्रभाकर टाके, गजानन  गाडेकर, रवि गाडेकर, निकिता   गाडेकर, सर्जेराव  ढवळे , प्रियंका गाडेकर, साधना गाडेकर, रोहित गाडेकर, सुदेश  गाडेकर, तुषार  गायकवाड, लक्ष्मणराव गाडेकर, बाबासाहब गाडेकर,  गोविंद गाडेकर, शिवाजीराव गाडेकर,  राधा गाडेकर  सीमा गाडेकर, अमोल गाडेकर, भगवान गाडेकर, पवन टाके, गजानन टाके, केशव टाके, दत्तात्रय टाके, रामकिशन टाके, योगेश टाके, महेश टाके, कुंडलिक टाके, मधुकर टाके, अनिरुद्ध टाके, बालासाहेब टाके, लिंबाजी लोखंडे, प्रताप टाके आदींसह सेलू तालुक्यातील महामार्गावरील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

जमीनीची गुणवत्ता तपासून तिन्ही कॅटेगीरीमध्ये मोबदला देण्यात यावा जमीनीचे दोन तुकडे झालेल्या शेतकऱ्यांसाठी वहिवाटीचा प्रश्न उभा राहू शकतो व त्यांचे कायमस्वरूपी नुकसान होवू शकते. त्यासाठी अंडर पासची (खालून मार्ग) याची व्यवस्था करावी याबाबत प्रोजेक्ट डायरेक्टर यांना अवगत करावे. सदर महामार्गाची उंची ०७ ते ०८ मिटर असल्याचे समजले आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण होऊन भविष्यात वाद निर्माण होवू शकतात. तरी शेतकऱ्यांना दळणवळणासाठी सर्विस रोडची तरतूद करावी 

हेही वाचा : घराघरात स्वराज्य उभारणार
हेही वाचा : VEDH : संघर्षयात्रींच्या प्रेरणादायी ‘वेध’ ने श्रोते अंतर्मुख

हेही वाचा : चिंतनशील : नरहर कुरुंदकरांवरील नाटकाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद
हेही वाचा : दोस्तांचा मेळा : पी.डी.जैन कॉलेजच्या डॉक्टरांचे गेट टुगेदर रंगले

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!