दोस्तांचा मेळा : पी.डी.जैन कॉलेजच्या डॉक्टरांचे गेट टुगेदर रंगले
३४ वर्षानंतर झाल्या एकमेकांच्या भेटी, स्नेहमेळा उत्साहात
परभणी : एकमेकांची ख्याली खुशाली विचारत गप्पा गोष्टी मारत कलागुणांचे सादरीकरण करीत परभणी येथील पी. डी.जैन होमिओपॅथी महाविद्यालयातील डॉक्टरांचे स्नेहमीलन ३४ वर्षानंतर रविवारी ( 20 नोव्हेंबर) छान रंगले. परभणी येथील पाथरी रोडवरील सरदेशपांडे यांच्या फार्म हाऊसवर परभणीच्या पी डी जैन होमिओपॅथिक महाविद्यालयात शिकलेले पहिल्या तीन बॅचचे तब्बल ४० मित्र-मैत्रिणी एकत्रित आले होते. सकाळच्या सत्रामध्ये परिचय, तर दुपारी हुरडा पार्टी. नंतर विविध कला गुणदर्शनाच्या कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. सायंकाळी जेवण झाल्यावर संगीत खुर्चीच्या खेळानंतर स्मृतिचिन्ह देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तब्बल ३४ वर्षानंतर मित्र मैत्रिणी भेटल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. स्नेहमीलनास पुणे, नांदेड, मुदखेड, कोल्हापूर, दौंड, देगलूर, लोणार आदी ठिकाणाहून वर्ग मित्र आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय दाभाडे, डॉ.प्रवीण जोग, डॉ.सिद्धार्थ पैठणे, डॉ.श्रीगोपाल दरक, डॉ प्रसाद चक्रवार, डॉ राजेश लाटकर, डॉ नविनचंद्र मोरे, डॉ.सचिन चिद्रवार, डॉ.मंगल लटपटे, डॉ.अस्मिता फड, डॉ.रेखा पवार आदींनी प्रयत्न केले.
हेही वाचा : चिंतनशील : नरहर कुरुंदकरांवरील नाटकाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद
हेही वाचा : घराघरात स्वराज्य उभारणार : छत्रपती संभाजीराजे
हेही वाचा : VEDH : संघर्षयात्रींच्या प्रेरणादायी ‘वेध’ ने श्रोते अंतर्मुख
हेही वाचा : जालना-नांदेड महामार्ग : …अन्यथा मुंबईला पायी दिंडी; सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा