धनलक्ष्मी : महिला नागरी पतसंस्थेचा शुभारंभ; 75 लाखांच्या ठेवी जमा
माधवानंद महाराजांच्या हस्ते उद्घाटन, प्रेक्षा भांबळे, रामप्रसाद घोडकेंसह मान्यवरांची उपस्थिती
सेलू जि.परभणी : येथील धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था शुभारंभ 75 खातेदारांनी 75 लाख रूपयांच्या ठेवीने केला. २१ डिसेंबर,बुधवार रोजी उमरखेड संस्थानचे मठाधिपती माधवानंद महाराजांच्या हस्ते पतसंस्थेचे उद्घाटन झाले.
या वेळी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्य़ा जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे, उद्योजक रामप्रसाद घोडक्, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद गट नेते रामनाना खराबे यांची प्रमुख उपस्थिती होती. पतसंस्थेच्या अधयक्ष शीलाताई काकडे व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोकराव काकडे यांनी महाराजांची पाद्य पूजा व शर्करा तुला केली.या वेळी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुकुंद आष्टीकर, अनिल कुलकर्णी, नंदकिशोर बंगाळे, श्रीवल्लभ बाहेती, गिरीश लोडाया, संतोश कुलकर्णी, बाळू चौधरी, रघुनाथ बागल आदींसह शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. महाराजांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदघाटनाच्या दिवशी पतसंस्थेत ७५ लाखाचे डिपॉझिट व ७५ खाती उघडण्यात आली. सूत्रसंचालन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले.
शहर व परिसरातील महिलांच्या सेेवेत पतसंस्था सुरू करण्यात आली आहे. विविध स्तरातील महिलांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, त्यांना स्वयंरोजगार उभे करता यावेत, किमान आर्थिक गरजा भागवता याव्यात. शिक्षण, आरोग्य, व्यवसायाला हातभार लागवा, या उद्धेशाने पतसंस्था कार्यरत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया पतसंस्थेचे मार्गदर्शक अशोक काकडे यांनी दिली.
हेही वाचा : ग्रामपंचायतीत : तरुणाईचाच बोलाबाला; प्रतिष्ठेची बाजी अन् लाखोंचा चुराडा…
हेही वाचा : अनुदान द्या हो : वालूर मंडळातील २१ गावांना अतिवृष्टी नुकसानभरपाई नाही
हेही वाचा : श्रीसाईबाबा : पाथरीतील श्रीसाईबाबा तीर्थक्षेत्र विकासाला गती द्या
हेही वाचा : संगीत महोत्सव : सेलूतील रसिकांनी शनिवार, रविवार सांगितिक मेजवानी