श्रीसाईबाबा : पाथरीतील श्रीसाईबाबा तीर्थक्षेत्र विकासाला गती द्या

श्रीसाईबाबा : पाथरीतील श्रीसाईबाबा तीर्थक्षेत्र विकासाला गती द्या

नागपूर हिवाळी अधिवेशन : आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे विधिमंडळ पायऱ्यावर लाक्षणिक उपोषण

SAKASHNEWS.COM

परभणी : पाथरी (जि.परभणी) येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी (२२ डिसेंबर) नागपूर हिवाळी अधिवेशनात, विधिमंडळाच्या पायऱ्यावर लाक्षणिक उपोषण करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.
आमदार धनंजय मुंडे, आमदार सुरेशराव वरपुडकर, आमदार विक्रम काळे, रत्नाकर गुट्टे, आमदार जयंत पाटील, आमदार नीलेश लंके, आमदार बाळासाहेब आजबे, राजेश पाटील व सदस्यांनी या वेळी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
या संदर्भात बाबाजानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. श्रीसाईबाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाथरी (जि.परभणी) येथे तत्कालीन सरकारने जन्मभूमीचा विकास व्हावा, यासाठी निधी व मंजुरी बाबतची घोषणा केली होती. त्यासाठी नगरपरिषद पाथरी व जिल्हाधिकारी परभणी यांनी यापूर्वी तीन वेळा श्री साईबाबा तिथक्षेत्र विकास आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत त्यास मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शिखर समितीकडून अंतिम मंजूरी देण्यात येणार होती. मुख्य सचिव अजय मेहता यांनी १४ फेब्रुवारी २०२०, सिताराम कुंटे यांनी ४ जून २०२१, तर श्री मनुकुमार श्रीवास्तव २० सप्टेबर २०२२ रोजी उच्चाधिकार समितीच्या बैठका घेतल्या. परंतु वारंवार त्रुटी काढून सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अद्यापही या आराखडयास उच्चाधिकार समितीची मान्यता मिळालेली नाही. त्यासाठी श्री साईबाबांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी पालकत्व स्वीकारून मुख्य सचिव यांच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीस व पुढील कामास गती देण्याबाबतचे आदेश करावेत, अशी मागणी दुर्राणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


ग्रामपंचायतीत : तरुणाईचाच बोलाबाला; प्रतिष्ठेची बाजी अन् लाखोंचा चुराडा…

हेही वाचा : अनुदान द्या हो : वालूर मंडळातील २१ गावांना अतिवृष्टी नुकसानभरपाई नाही

हेही वाचा : धनलक्ष्मी : महिला नागरी पतसंस्थेचा शुभारंभ; 75 लाखांच्या ठेवी जमा

हेही वाचा : संगीत महोत्सव : सेलूतील रसिकांनी शनिवार, रविवार सांगितिक मेजवानी   

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!