संगीत महोत्सव : सेलूतील रसिकांना शनिवार, रविवार सांगितिक मेजवानी
संगीत रत्न हरिभाऊ चारठाणकर स्मृती संगीत महोत्सव : नामवंत गायक, कलावंतांची हजेरी
सेलू जि.परभणी : संगीत रत्न हरिभाऊ चारठाणकर स्मृतीत घेतला जाणारा संगीत महोत्सव शनिवारी व रविवारी (२४ व २५डिसेबर )येथील साई नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने सेलूतील रसिकांना दोन दिवस संगीताची मेजवानी मिळणार आहे.
संगीत महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून मराठवाड्यातील नवोदिता बरोबरच संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंत या महोत्सवात हजेरी लावणार आहेत. २४ डिसेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन होईल. मराठवाड्यातील उदयोन्मुख कलावंत जयश्री जोशी, अभिजित अपस्तंभ (नांदेड) यांचे गायन होईल. बनारस घराण्याचे विख्यात सारंगी वादक संगीत मिश्रा (बनारस)यांचे सारंगी वादन, तर गायक प्रसाद खापर्डे (नाशिक) यांचे गायन होईल.
२५ डिसेंबर रोजी स्थानिक कलावंत यशवंत चारठाणकर यांच्या गायनाने सुरू होईल. रामभाऊ बोरगांवकर(लातूर)यांचे तबला सोलो वादन होईल. औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन गुरूकुलातील कलावंत शितल भाबरे, राधा जहागीरदार,सिद्धी सोनटक्के या कत्थक शास्त्रीय नृत्य सादर करतील. महोत्सवातील शिखरमैफिल प्रसिद्ध गायक पं.रघुनंदन पणशीकर(पुणे)यांची होईल. महोत्सवात साथसंगत करण्यासाठी शांती भूषण चारठाणकर, मंगेश जवळेकर, सौरभ कान्हेकर,प्रशांत गाजरे, हनुमंत फडतरे, अविनाश पाटील,शिवाजी पाठक सहभागी होत आहेत. महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
ग्रामपंचायतीत : तरुणाईचाच बोलाबाला; प्रतिष्ठेची बाजी अन् लाखोंचा चुराडा…
हेही वाचा : अनुदान द्या हो : वालूर मंडळातील २१ गावांना अतिवृष्टी नुकसानभरपाई नाही
हेही वाचा : धनलक्ष्मी : महिला नागरी पतसंस्थेचा शुभारंभ; 75 लाखांच्या ठेवी जमा
हेही वाचा : श्रीसाईबाबा : पाथरीतील श्रीसाईबाबा तीर्थक्षेत्र विकासाला गती द्या