टेनिसव्हॉलिबॉल : खेळाच्या विकासासाठी  शरद पवार, मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी दिल्लीत चर्चा

टेनिसव्हॉलिबॉल : खेळाच्या विकासासाठी  शरद पवार, मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी दिल्लीत चर्चा

डॉ.व्यंकटेश वांगवाड, गणेश माळवे व संघटना पदाधिकारी यांनी घेतली भेट 

सेलू : आंतरराष्ट्रीय टेनिसव्हॉलिबॉल फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.व्यंकटेश वांगवाड व महाराष्ट्र राज्य सचिव गणेश माळवे यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन टेनिस व्हॉलिबॉल खेळाच्या विकासासाठी मदत करण्याचे विनंती केली. त्यांना टेनिस व्हॉलिबॉल खेळाची माहिती देऊन या खेळाच्या प्रसारासाठी मदत करण्याचे साकडे घातले. दिल्ली सचिव हरेंद्र कुमार, हरियाणा सचिव परवेज राणा, सुरेंद्र शास्त्री, निकिता डागर आदींची देखील भेट घेऊन त्यांना टेनिस व्हॉलिबॉल खेळाची सविस्तर माहिती दिली.

डॉ.व्यंकटेश वांगवाड व गणेश माळवे यांनी महाराष्ट्राच्या मातीतील खेळ जगाच्या पाठीवर घेऊन जाण्यासाठी, खेळाच्या विकासासाठी चर्चा केली. तसेच टेनिस व्हॉलिबॉल खेळास ऑलिम्पिकसाठी व आंतरराष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा आयोजना संदर्भात शरद पवार व रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली. भारतीय ऑलिम्पिक महासंघाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयात अंतिम मान्यतेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या निवासस्थानी भेट देऊन टेनिस व्हॉलिबॉल खेळाची माहिती पुस्तिका देण्यात आली. या भेटीसाठी खासदार संजय जाधव, खासदार वंदना चव्हाण, माजी आ.हरीभाऊ लहाने, भास्करराव दानवे, विजय कान्हेकर, शिंपले राजेंद्र, गजानन वाळके, चंद्रकांत बोराडे यांचे सहकार्य लाभले

टेनिसव्हॉलिबॉल : खेळाच्या विकासासाठी  शरद पवार, मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी दिल्लीत चर्चा

टेनिसव्हॉलिबॉल खेळाच्या आजपर्यंत २४ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच विदेशात श्रीलंका, भुतान, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, थायलंड, इराण, अफगाणिस्तान, जपान, मलेशिया या देशात या खेळाचा प्रसार झाला आहे अशी माहिती दिली. तसेच १६ जुलै जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिनाचे औचित्य साधून साऊथ आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजन बाबत आंतरराष्ट्रीय फेडरेशन अध्यक्ष डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी माहिती दिली.

हेही वाचा ; स्नेहसंमेलन : सेलूतील नूतन इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

हेही वाचा : पतंजली सेवा समिती : ब्राह्मणगावात योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

हेही वाचा : ‘जलतारा’ : मंठा तालुक्यातील 50 गावे बनली पाणीदार; श्रीश्री रविशंकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार गुरूवारी पाहणी

हेही वाचा : स्ट्रीट लाईट सुरु करा : सेलूच्या मुख्याधिकाऱ्यांकडे भाजपाची मागणी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!