स्नेहसंमेलन : सेलूतील नूतन इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम, विजेत्यांचे झाले कौतुक
सेलू : येथील नूतन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एमलोया होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ.वरूण नागोरी यांची उपस्थिती होती. या वेळी प्रकाशचंद बिनायके, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, डॉ.विजेंद्र नागोरी, एन पी पाटील, नंदकिशोर बाहेती, उषा साडेगावकर, बोराडे, भुजंग देऊळगावकर आदींची उपस्थिती होती. स्नेहसंमेलनानिमित्त सहा दिवस विविध मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. देशभक्तीपर गीते, नाटिका, नृत्य सादर करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व पारोतोषिक देऊन कौतुक करण्यात आले. या वेळी पालक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी श्री बायस, श्री नाईक, श्री दळवी, श्री चिनके, श्री चिटणीस, सौ इक्कर, सौ.सोलापूरे सौ.चिटणीस, संज़ना लोया सौ.ढवळे आदींनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : पतंजली सेवा समिती : ब्राह्मणगावात योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
हेही वाचा : स्ट्रीट लाईट सुरु करा : सेलूच्या मुख्याधिकाऱ्यांकडे भाजपाची मागणी