पतंजली सेवा समिती : ब्राह्मणगावात योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामस्थांचा मोठा सहभाग, पाच दिवस चालणार शिबिर
सेलू : तालुक्यातील मौजे ब्राह्मणगाव पी.पी. येथे पतंजली सेवा समिती परभणीचे योग शिक्षक नाना गजमल यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर 31 जानेवारी ५ फेब्रुवारी या कालावधीमध्ये योग शिबिर उत्साहात शिबिर पार पडत आहे. आज ब्राह्मणगाव गावातील जवळपास 30 महिला आणि 30 पुरुष अशा प्रकारे 60 योग विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या शिबिराला कुंडलिक शेळके, आनंद डोईफोडे, महादेव गायके, रामप्रसाद डोईफोडे, महादेव डोईफोडे, जनार्दन डोईफोडे, शाळीग्राम डोईफोडे, रेखा डोईफोडे, सिंधू डोईफोडे, रेश्मा कांबळे आदीसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये लहान मुले व मुली सुद्धा आनंदाने सहभागी होत आहेत.
हेही वाचा : स्नेहसंमेलन : सेलूतील नूतन इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
हेही वाचा : स्ट्रीट लाईट सुरु करा : सेलूच्या मुख्याधिकाऱ्यांकडे भाजपाची मागणी