स्ट्रीट लाईट सुरु करा : सेलूच्या मुख्याधिकाऱ्यांकडे भाजपाची मागणी

स्ट्रीट लाईट सुरु करा : सेलूच्या मुख्याधिकाऱ्यांकडे भाजपाची मागणी

बंद पथदिव्यांमुळे अनेक भागातील रस्ते अंधारात

सेलू : सेलू शहरातील अनेक भागातील बंद पथदीवे सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी  मुख्याधिकारी देवीदास जाधव यांना मंगळवारी,३१ जानेवारी रोजी निवेदनाव्दारे केली आहे.
सेलू शहरातील अनेक भागातील स्ट्रीट लाईट बंद आहेत. यामुळे लोकांना त्रास होत आहे. रात्रीच्या वेळेस देवदर्शनासाठी जाणारे महिला पुरुष, शिकवणीसाठी जाणारे विद्यार्थी तसेच पादचाऱ्यांना या बंद लाईटमुळे त्रासाचा सामना करावा लागत आहे. बंद लाईटमुळे अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपरिषदेने ताबडतोब संपूर्ण शहरातील स्ट्रीट लाईट सुरू करावेत. नसता भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी जयसिंग शेळके, कपिल फुलारी, शिवहरी शेवाळे, भागवत दळवे, दगडोबा जोगदंड, गोविंद शर्मा, पंकज वायाळ, सुनील चव्हाण, गोविंद मगर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


हेही वाचा ; शिक्षक मतदारसंघ निवडणूक : परभणी जिल्ह्यात एकूण ९०.१७ टक्के मतदान

हेही वाचा : ‘जलतारा’ : मंठा तालुक्यातील 50 गावे बनली पाणीदार; श्रीश्री रविशंकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार गुरूवारी पाहणी

हेही वाचा : प्रयोगशाळा उद्घाटन : विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती निर्माण व्हावी : एसडीओ अरूणा संगेवार

हेही वाचा : सन्मान : सेलूतील साईबाबा बॅंकेतर्फे हाजी शफीक अली खान यांचा सत्कार

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!