शिक्षक मतदारसंघ निवडणूक : परभणी जिल्ह्यात एकूण ९०.१७ टक्के मतदान
शिक्षकांनी नोंदविला उत्स्फूर्तपणे सहभाग, सेलू तालुक्यात 94.94 टक्के मतदान
परभणी : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण १८ केंद्रांवर आज सोमवारी (३० जानेवारी) शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. एकूण ९०.१७ टक्के मतदान झाले. सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली. जिल्ह्यात एकूण ४ हजार ५५८ इतके मतदार असून यात ३ हजार ८६७ पुरूष तर ८५१ महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी ४ हजार ११९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदार ३ हजार ५३१, तर स्त्री मतदारांची संख्या ५८८ आहे. महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षासह मराठवाडा शिक्षक संघ व अन्य संघटनेच्या प्रमुख उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदानासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याचे दिसून आले.सेलू तालुक्यातील सेलू व वालूर मतदान केंद्रावर २९७ पैकी २८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदान ९४.९४ टक्के झाले.
हेही वाचा : सन्मान : सेलूतील साईबाबा बॅंकेतर्फे हाजी शफीक अली खान यांचा सत्कार