सन्मान सोहळा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचा शनिवारी सेलूत सत्कार; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम

सन्मान सोहळा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचा शनिवारी सेलूत सत्कार; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम

मुख्याधिकारी देविदास जाधव, शशीकांत देशपांडे, विजय कान्हेकर यांचाही गौरव

डॉ.प्रताप काळे हे सेलू येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. लातूर येथील सेवेनंतर त्यांना परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवेत पदोन्नती मिळालेली आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितांना, प्राधान्य, संरक्षण देणारे, विकासाला पाठबळ देणारे अधिकारी म्हणून डॉ.प्रताप काळे यांचा लौकिक आहे.

सेलू : परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे, सेलूचे मुख्याधिकारी देविदास जाधव, महात्मा गांधी सेवा संघाचे अध्यक्ष शशीकांत देशपांडे, सचिव विजय कान्हेकर यांचा शनिवारी (४ फेब्रुवारी) सन्मान सोहळा सेलू येथे आयोजित करण्यात आला आहे.
विनोद बोराडे मित्र मंडळाच्यावतीने साई नाट्य मंदिरात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
डॉ.प्रताप काळे हे सेलू येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. लातूर येथील सेवेनंतर त्यांना परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवेत पदोन्नती मिळालेली आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितांना संरक्षण देणारे, विकासाला पाठबळ देणारे अधिकारी म्हणून डॉ.प्रताप काळे यांचा लौकिक आहे. त्यानिमित्त त्यांचा स्वागत सन्मान; तसेच मुख्याधिकारी देविदास जाधव, महात्मा गांधी सेवा संघातर्फे देशपातीळवर दिव्यांगांसाठी केलेल्या कार्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाल्या बद्दल महात्मा गांधी सेवा संघाचे अध्यक्ष शशीकांत देशपांडे, सचिव विजय कान्हेकर आदी मान्यवरांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व मित्रमंडळाने केले आहे.

विनोद बोराडे

या सोहळ्यानिमित्त मुंबई येथील महाराष्ट्राचे महागायक गीत स्पर्धा विजेते मोहम्मद आयाज यांचा सुप्रसिध्द ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे. याचाही आनंद घ्यावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व मित्रमंडळ संयोजकांनी केले आहे.


हेही वाचा : अमृत महोत्सव : रंगभरण स्पर्धेला मोठा प्रतिसाद; सेलूतील नूतन प्राथमिक शाळेचा उपक्रम 

हेही वाचा : टेनिसव्हॉलिबॉल : खेळाच्या विकासासाठी  शरद पवार, मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी दिल्लीत चर्चा

हेही वाचा : पतंजली सेवा समिती : ब्राह्मणगावात योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

हेही वाचा : स्ट्रीट लाईट सुरु करा : सेलूच्या मुख्याधिकाऱ्यांकडे भाजपाची मागणी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!