अमृत महोत्सव : रंगभरण स्पर्धेला मोठा प्रतिसाद; सेलूतील नूतन प्राथमिक शाळेचा उपक्रम
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव : सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत रंगभरण स्पर्धा उत्साहात
सेलू : येथील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या वतीने गुरुवारी ( दोन फेब्रुवारी) हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आंतरशालेय रंगभरण स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.
सेलू शहरातील पूर्व प्राथमिक विभाग ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, प्रमुख पाहुणे म्हणून सायकल प्रेमी कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर उपस्थित होते. होते. याप्रसंगी संस्थेचे सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, सदस्य मकरंदजी दिग्रसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे यांनी प्रास्ताविक केले. सहभागी विद्यार्थ्यांना व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष नंदकिशोरजी परताणी यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला; तसेच बापूसाहेब पानझाडे यांच्यावतीने रंग पेटीचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सोनाली कुबरे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कला विभाग प्रमुख संदीप खाटीकमारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रमेश काळे, अनिल रत्नपारखी, उल्हास पांडे, छाया बोबडे व शिक्षकांनी पुढाकार घेतला.
सहभागी विद्यार्थ्यांना व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष नंदकिशोरजी परताणी यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला; तसेच बापूसाहेब पानझाडे यांच्यावतीने रंग पेटीचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सोनाली कुबरे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कला विभाग प्रमुख संदीप खाटीकमारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रमेश काळे, अनिल रत्नपारखी, उल्हास पांडे, छाया बोबडे व शिक्षकांनी पुढाकार घेतला.
हेही वाचा : पतंजली सेवा समिती : ब्राह्मणगावात योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद