बापाचा रान वेढा : अभिजित मंगरूळकरांच्या काव्यसंग्रहाचे सेलूत प्रकाशन
माजी आमदार विजय भांबळे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आदींसह मान्यवरांची उपस्थिती
सेलू, जि.परभणी : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या भावभावनांचा प्रतिबिंब असणाऱ्या नवोदित कवी अभिजित खरात मंगरूळकर यांच्या ‘बापाचा रान वेढा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिती रविवारी, 17 एप्रिल रोजी झाले. साई नाट्यगृहात स्व.अण्णासाहबे काकडे सेवाभावी संस्थेच्यावतीन सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. या वेळी आमदार बाबाजानी दुरार्णी, नामदेव महाराज ढवळे, माजी आमदार विजय भांबळे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, राजेंद्र लहाने, प्रा.केडी.वाघमारे, शफीक अली खान, ब्रिजगोपाल काबरा. रणजीत गजमल, पुरूषोत्तम पावडे, दत्तराव मायंदळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, अशोक उफाडे, वरद काकडे यांची उपस्थिती होती. ‘ बापाचा रान ऐढा’ या काव्यसंग्रहामध्ये एकूण 55 कवितांचा समावेश आहे. कवी अभिजित मंगरूळकर यांनी शेतकऱ्यांचा व्यथा, वेदनांची मांडणी त्यामध्ये केली आहे.
अभिजित खरात यांचे मूळ गाव मंगरुळ (खरात) (ता.घनसावंगी जि.जालना) हे आहे. एका शेतकरी कुटुंबात ०५ जानेवरी,२००४ या रोजी त्यांचा जन्म झाला. वडिलांचे शेतीत केलेले कष्ट मी जवळून अनुभवले असे सांगून खरात म्हणतात, माझ्या गावाचे सुंदर अस वैभव म्हणजे गावा शेजारुन गेलेली गोदावरी नदी व श्री राम प्रभुंचे वनवासात गावाला लागलेले चरण स्पर्श. यामुळे गावात प्रसन्न वातावरण आहे. गोदावरी नदीच्या भरपूर पाणी अभिजीत खरात (मंगरुळकर) या नावाने मला ओळखल जावं तसेच, आपल्या पात्रामुळे गावचे हिरव दिसणारे शिवार. त्यात राबणारे कष्टकरी हात यातुनच स्फूरलेल्या ‘बापाचा रान ऐढा’ तील कविता वाचकाला रान शिवाराचा आनंद देतील आणि शेतकऱ्यांच्या भावभावनांमध्ये ते एकरूप होतील
सन्मान कर्तृत्वाचा : विविध क्षेत्रांतील कर्तृत्वांचा सेलूत सन्मान; काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम
साईबाबा बँकेला 3 कोटी 43 लाखांचा नफा : हेमंतराव आडळकर; ठेवी 200 कोटींच्या घरात